राधे तुझा सैल अंबाडा

कसा ग गडे झाला ? कुणी ग बाई केला ?
राधे, तुझा सैल अंबाडा

पृथ्वीच्या पेल्यात गाळिली, रजनीच्या बागेतिल द्राक्षें
भुलवुनि तुजला वनांत नेली, रसरसलेली रात्र रंगली
वाजविता बासरी,
कचपाशांचा नाग उलगडी फणा

पहिल्या चंचल भेटीमधली, बाल्याची कबुतरें पळाली
वेणी तिपेडी कुरळी मृदुला, सुटली घालित गंध-सडा

भ्रमर रंगी हा श्याम सापडे, नीलकमल कचपाशि तव गडे
अरुणोदय होताच उलगडे, पाकळी पाकळी होइ मोकळी
या कोड्याचा झाला उलगडा
कच - केस.
पाश - जाळे.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा