A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राघू बोले मैनेच्या कानात

राघू बोले मैनेच्या कानात ग
चल सखे अंब्याच्या वनात ग

तुझ्या चोचीत चोच
माझ्या चोचीत चोच
पानाआड शीळ घुमे दचकून तोच
प्रीतीचा खेळ खेळे संकोच ग

वळीव पाऊस तुझ्या डोळ्यांतला
अन्‌ गुलाबी गोडवा झुरणीतला
वेड लावी नखरा रूपातला
मोहरून गेला पानापानांत ग

शुक शुक सगळं चांदणीरात
अमृत भरलं चराचरांत
आळिमिळी गुपचिळी बाहुपाशात
गुपित बोलुया श्वासात ग
दळिद्र - दारिद्र्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.