A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रघुपती आपल्या पदस्पर्शाने

रघुपती आपल्या पदस्पर्शाने पावन मज केले

अनेक शतकांचे धुलीकण
बसले होते अंग लपेटून
पाषाणाचे कठोर दु:सह जीवन मी जगले

देवेंद्राने मला फसविले
अजाणता मी पापी ठरले
पतिच्या निष्ठूर शापवाणीने हाय बळी पडले

दिनरात्रीचे मोजित क्षण क्षण
वाट पाहिली व्याकुळ होऊन
करुणाघन तू या अबलेला संजीवन दिधले
गीत - मा. गो. काटकर
संगीत -
स्वर- माणिक वर्मा
राग - मल्हार
गीत प्रकार - राम निरंजन, भक्तीगीत
दु:सह - असह्य / कठोर / अवघड.
संजीवन - पुनुरुज्‍जीवन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.