A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रामनाम ज्याचे मुखी

रामनाम ज्याचे मुखीं ।
तो नर धन्य तिनीं लोकीं ॥१॥

रामनाम वदतां वाचें ।
ब्रह्मसुख तेथें नाचे ॥२॥

रामनामें वाजे टाळी ।
महादोषां होय होळी ॥३॥

रामनाम सदा गर्जें ।
कळिकाळ भय पाविजें ॥४॥

ऐसा रामनामीं भाव ।
तया संसाराचि वाव ॥५॥

आवडीनें नाम गाय ।
एका जनार्दनीं वंदी पाय ॥६॥
पैं - निश्चय्यार्थक.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.