A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंगवी रे चित्रकारा

गुंजते सर्वांग माझे गोड उठती झंकृती
रंगवी रे चित्रकारा हीच माझी आकृती

काजळावाचून डोळे आज दिसती देखणे
गोरट्या या अंगरंगा न्हाऊ घाली चांदणे
अर्पणाच्या ओंजळीला आज लाभे स्विकृती
हीच माझी आकृती !

दाटला रे हर्ष ओठी, हळूच वळते हनुवटी
रोमरोमी या शरीरी लाजरीची रोपटी
उमज माझी मज पडेना, स्वप्‍न की ही जागृती
हीच माझी आकृती !

अंगलटीची ऐट झाली आज काही वेगळी
मधुप पुढती थांबलेला, फूल लपवी पाकळी
अधीरले मी मीलनासी परि न करवे ती कृती
हीच माझी आकृती !
चित्रपटात हे गीत नायिकेच्या तोंडी होतं आणि निरनिराळ्या वेषात, निरनिराळ्या ठिकाणी चित्रित व्हायचं होतं. त्याकरता मधल्या संगीत खंडात (म्युझिक पीसेस) सुद्धा सतार, सरोद, तबला याचबरोबर सॅक्सोफोन, कोंगो, बोंगो या पाश्चात्य वाद्यांचा वापर केला आहे.
मुख्य म्हणजे सगळ्या अंतर्‍याच्या चाली वेगवेगळ्या बनवल्या आहेत. अस्ताई केरव्यात तर अंतरे रूपक तालात बसवले आहेत.

* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.