A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रंगरेखा घेउनी मी

रंगरेखा घेउनी मी भावरेखा रेखिते
सावळे ते रूप नाथा लोचनी मी पाहते !

श्यामकांती पाहता ती आसवे ती दाटती
उर्मिलेच्या भावऊर्मी अंतरी हेलावती
अंतरीची आर्तता ती आज गीते छेडिते !

आपुल्या हो संगती ते राम आणि जानकी
प्रीतीने विरही परंतु एकटी मी मंचकी
आसवांची मालिका मी श्यामकंठी घालते !

आपुल्या मी दर्शनाला आज झाले पारखी
भेट होता आपुली ती जन्म होई सार्थकी
एक आशा मीलनाची लोचनी या जागते !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.