रात्रीच्या धुंद समयाला
रात्रीच्या धुंद समयाला शिणगार साज मी केला
सख्या घडीभर बसुनी बोला

हृदयाची कळी जागली शिणवली नयन बाहुली
वाट बघुनि जीव हा थकला

ओठांत भाव थरकले घुंगरू छननन वाजले
बांधला सुरांचा झोला

तबकात विड्याचा थाट केशरी गंध वार्‍यात
प्रणयास आगळा थाट चौरंग बाहुंचा केला