A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
राया मला पावसात नेऊ नका

नाही कधी का तुम्हांस म्हटलं, दोष ना द्यावा फुका
अहो राया, मला पावसात नेऊ नका !

लई गार हा झोंबे वारा
अंगावरती पडती धारा
वाटेत कुठेही नाही निवारा
भिजली साडी, भिजली चोळी
भोवतील ओल्या चुका
अहो राया मला पावसात नेऊ नका !

कबुतरागत हसत बसुया
ऊबदारसं गोड बोलुया
खुळ्या मिठीतच खुळे होऊया
लावून घेऊ खिडक्या दारं
पाऊस होईल मुका
अहो राया मला पावसात नेऊ नका !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.