A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सहज सख्या एकटाच येई

सहज सख्या एकटाच येइ सांजवेळी
वाट तुझी पाहिन त्या आम्रतरूखाली !

हिरवळीत गीत गात
सांजरंगि न्हात न्हात
स्वप्‍नांना रंगवुया लेवुनिया लाली !

अधरी जे अडत असे
सांगिन तुज गुज 'असे'
प्रीती ही प्रीतीविण अजूनही अबोली !

तृणपुष्पे मोहक ती
उमलतील एकान्‍ती
चांदण्यात उमलवुया प्रीत भावभोळी !
गीत - सूर्यकान्‍त खाण्‍डेकर
संगीत - श्रीनिवास खळे
स्वर- आशा भोसले
राग - पहाडी
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना - ३ नोव्हेंबर १९५७, कोल्हापूर.
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
तृण - गवत.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.