सखू आली पंढरपूरा

आलिंगुनी अंगिकारा, बाप रखुमाईच्या वरा
सोडूनिया घरदारा, सखू आली पंढरपूरा

अनवाणी पायपिटी, किती केली आटाआटी
सगुणरूप भेटीसाठी तोडिल्या मी बंधनगाठी
तुळशीहार घाली कंठी विटुनीया संसारा

संत तुकोबाची वाणी, भक्तीची ती शिकवणी
लागता मी तुझ्या भजनी, छळिली ही सुवासिनी
सर्वसाक्षी सर्वज्ञानी, तुला ठावे परमेश्वरा

सार्‍या इंद्रियांचे प्राण डोळियांत व्याकळून
मायबाप तुला शरण मागते मी विनवून
दिला जन्म, देई मरण, लेकिला या विश्वंभरा
अंगीकार - स्वीकार.
आटाआट - कष्ट, खटपट.
विटणे - कंटाळा येणे.
विश्वंभर - विश्वाचे पालन-पोषण करणारा ईश्वर.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा
Random song suggestion