A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सांज झाली तरी माथ्यावरी

सांज झाली तरी, माथ्यावरी उन्हाचे भरते !
अशी एकाकी मी, माझी मला माझी न मी उरते !

घाई जगण्याची, अशी दाटली गर्दी भवती
आणि रस्‍त्‍यात भर उन्हात, तुझा हात सुटला
थकले मी धावुनी, सावलीचा पाठलाग करते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते !

साद ना पोचली माझी कधी हृदयास तुझ्या
मी कितीदा तुझ्या वळणावरी कण्हले होते
ते तुझे दु:ख आता संध्याकाळी सोबत करते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते !

धागे तुटले जरी स्वप्‍ने तुझी विणता विणता
ती वीण आजही छातीतली निरगाठ आहे
ही नजर आजही तू नेलेल्या दिवसात भिडते
सांज झाली तरी माथ्यावरी उन्हाचे भरते !
गीत - गजेंद्र अहिरे
संगीत - भास्कर चंदावरकर
स्वराविष्कार- साधना सरगम
हरिहरन
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
चित्रपट - सरीवर सरी
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.