श्रीरामाचे चरण धरावे

श्रीरामाचे चरण धरावे
दर्शनमात्रे पावन व्हावे

सती अहिल्या दगडामाजी
शापित होउन युगयुग मोजी
परि प्रभूच्या पदस्पर्शाने पाषाणासही जीवन द्यावे

उष्टी बोरे अर्पुन प्रभुला
शबरीने जणु ठाव पाहिला
स्वीकारुन ती रघुरायाने देवपणाचे बीरुद ल्यावे

वनवासातच जीवन सरले
रामायणही तिथेच घडले
अयोध्येस प्रभु परतुनि येता प्रेमाश्रूंनी नगर भिजावे
अहल्या - गौतम ऋषी पत्‍नी. त्यांच्या शापाने ती शिळा झाली होती.
शबरी - एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्तीण.

 

Random song suggestion
मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा