A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुंदर खाशी सुबक ठेंगणी

सुंदर खाशी सुबक ठेंगणी स्थूल न, कृशहि न, वय चवदाची ॥

नयन मनोहर वनहरिणीचे, नाक सरळ जशि कळि चांफ्याची ॥

भृकुटि वांकड्या, केश सडक मृदु, दंतपंक्ति ती कुंदकळ्यांची ॥

ओंठ पोंवळी, हनु चिंचोळी, लालि गुलाबी गालांवरची ॥
गीत - गो. ब. देवल
संगीत - गो. ब. देवल
स्वर-
नाटक - शारदा
चाल-मंदस्मित अरविंद
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
कुंद - एक प्रकारचे सुवासीक, पांढरे फुल / एक प्रकारचे गवत / स्थिर हवा.
चिंचोळी - क्रमाने निमुळता होत गेलेला.
भृकुटी (भ्रू) - भिवई.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.