A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की, अजूनही चांदरात आहे

कळे न मी पाहते कुणाला? कळे न हा चेहरा कुणाचा?
पुन्हापुन्हा भास होत आहे- तुझे हसू आरशात आहे !

सख्या तुला भेटतील माझे तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारिजात आहे !

उगीच स्वप्‍नात सावल्यांची कशास केलीस आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे?
गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा
राग - पटदीप
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.