A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तस्कराहातीं द्विजगोधन

तस्कराहातीं । द्विजगोधन हरिलें ।
तयां पार्थासि शरण आणिलें ।
आयुधागारीं धर्मा निजवीलें ।
द्रौपदीसह त्या दावियलें ।
मुनीच्या दंडा । पात्र त्यास केलें ।
तीर्थ यात्रेसी पाठविलें । नारदातें मीं ।
त्यासि भेटवीलें । इकडचें वृत्त जाणवीलें ।
गीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
संगीत - अण्णासाहेब किर्लोस्कर
स्वर-
नाटक - सौभद्र
चाल-समज धर गड्या
गीत प्रकार - नाट्यसंगीत
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.
तस्कर - चोर.
द्विज - ब्राह्मण - क्षत्रिय - वैश्य / पक्षी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.