ते कसे ग ते कसे
ते कसे ग ते कसे ?
देव्हार्यातील देव जसे !
कोंदणातले ते रत्न जसे, तसेच त्यांचे तेज असे
पळभर माझ्यावाचुन त्यांना मुळीच बाई चैन नसे !
ते असे ग ते असे, देव्हार्यातील देव जसे !
आणि सासरे तुझे कसे ? मामंजी ग, बाई कसे ?
रागिट चर्या, मनात माया, मुळी वावगे खपत नसे
मामंजी ते बाई असे, फणसामधले गरे जसे !
आणि तुझी ती सासू कशी ?
निर्मळ गंगामाय जशी
राग तयांचा आग परि त्या मायेलाही अंत नसे
सासुबाईंना 'आई' म्हणावे असेच मला वाटतसे !
नणंद बाई तुझी कशी ?
लवंगी मिरची तिखट जशी
ठेंगणी ठुसकी, मुळात रुसकी, नटण्यावाचून काम नसे
चुरुचुरू बोलते, चहाड्या करते, उणे सारखे काढितसे !
दीर तुझे ते बाई कसे, तुझे भाउजी सांग कसे ?
आपण हसती, जगा हसविती, राग तयांना येत नसे
भावावरती प्रेम असे की रामप्रभूंचे भरत जसे !

| गीत | - | विहंग |
| संगीत | - | गजानन वाटवे |
| स्वर | - | मालती पांडे, प्रमोदिनी देसाई |