तू ... मी ... रे साजणा
तू ..... मी ...... रे साजणा !
कुणी कुणा हरविले, कुणी कुणा जिंकियले
खरं खरं सांग ना !
स्वप्नात मी दंग झाले
मी नवतीचा रंग ल्याले
लाटांवरी खेळ चाले
प्रीतित मी चिंब न्हाले
डोलते मी तालावरी, लाज माझ्या गालावरी लपविता राहिना !
हा मंद हा धुंद वारा
वेड्या मिठीचा शहारा
एकांत देई इशारा
नौकेस लाभे किनारा
सारे सारे तुझ्यामुळे सारे सारे तुला दिले, भोळी माझी भावना !
कुणी कुणा हरविले, कुणी कुणा जिंकियले
खरं खरं सांग ना !
स्वप्नात मी दंग झाले
मी नवतीचा रंग ल्याले
लाटांवरी खेळ चाले
प्रीतित मी चिंब न्हाले
डोलते मी तालावरी, लाज माझ्या गालावरी लपविता राहिना !
हा मंद हा धुंद वारा
वेड्या मिठीचा शहारा
एकांत देई इशारा
नौकेस लाभे किनारा
सारे सारे तुझ्यामुळे सारे सारे तुला दिले, भोळी माझी भावना !
| गीत | - | जगदीश खेबूडकर |
| संगीत | - | सुधीर फडके |
| स्वर | - | आशा भोसले |
| चित्रपट | - | चंद्र होता साक्षीला (१९७८) |


















