A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उतरला स्वर्ग इथे साक्षात

संसारी या आनंदाची नित्य नवी बरसात
उतरला स्वर्ग इथे साक्षात

धरी घरावर चंदन छाया
फुले पसरती सुगंध-माया
सांज लाविते मांगल्याची सदनी या फुलवात

असे पित्याची पाखर मजवर
होऊन पावन नटले अंतर
मधु मायेचे दिव्य चांदणे फुलते अंधारात

हे जगदंबे मायमाउली
असो शिरावर तुझी साउली
सुखसंसारी तारतील मज तुझेच आशीर्वाद
गीत -
संगीत -
स्वर- आशा भोसले
गीत प्रकार - चित्रगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.