A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विटेवरच्या विठ्ठलाची

लाखात लाभले भाग्य तुला ग बाई
विटेवरच्या विठ्ठलाची झालीस रखुमाई

मेघासम जो हसरा श्यामल
चंद्राहुनी तो अधिकही शीतल
नाम जयाचे मुखात येता
रूप दिसे ग ठायी ठायी

भक्तांचा जो असे आसरा
या विश्वाचा हरी मोहरा
क्षणांत इकडे क्षणांत तिकडे
हाकेला ग धाव घेई
ठाय - स्थान, ठिकाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.