A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
विठुमाउली तू माउली जगाची

विठुमाउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला ऽ पांडुरंगा ऽऽ
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू? कसं होऊ उतराई?
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माउलीत मूर्ति विठ्ठलाची
विठ्ठला ऽ मायबापा ऽऽ
उतराई - ऋणमुक्त.
पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  जयवंत कुलकर्णी, सुधीर फडके, सुरेश वाडकर