A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वृंदावनी वेणु कवणाचा

वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे ।
वेणुनादें गोवर्धनु गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनि मयूर विराजे ।
मज पाहतां भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरूं विसरली ।
गाईव्याघ्र एके ठायीं जालीं ।
पक्षीकुळें निवांत राहिलीं ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ।
वांकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानीं बैसोनि स्तुती गाती ।
भानुदासा फावली प्रेम-भक्ति ॥४॥
ठाय - स्थान, ठिकाण.
तृण - गवत.
वेणु - बासरी.
शेष - पृथ्वी डोक्यावर तोलून धरणारा सर्पांचा राजा.
मूळ रचना

वृंदावनी वेणु कवणाचा माये वाजे ।
वेणुनादें गोवर्धनु गाजे ॥१॥

पुच्छ पसरूनि मयूर विराजे ।
मज पाहता भासती यादवराजे ॥२॥

तृणचारा चरूं विसरली ।
गाई-व्याघ्र एके ठायीं जाली ।
पक्षीकुळें निवांत राहिलीं ।
वैरभाव समूळ विसरली ॥३॥

यमुनाजळ स्थिर स्थिर वाहे ।
रविमंडळ चालतां स्तब्ध होय ।
शेष-कूर्म-वराह चकित राहे ।
बाळा स्तन देऊं विसरली माय ॥४॥

ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती ।
वांकी रुणझुण रुणझुण वाजती ।
देव विमानीं बैसोनि स्तुती गाती ।
भानुदासा फावली प्रेम-भक्ति ॥५॥

(कूर्म- कासव, वराह- डुक्कर)

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.