A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ये झणीं ये रे माघारी

ये झणीं ये रे । ये रे । ये रे माघारी ॥

क्षणभरी वळुनी, बघ मम नयनीं, मूर्ति अपुली ।
कुठवर एकली वाट पाहूं । तुजविण राहूं ।
विसरुनि जाशिलही ।
नवथर प्रीत खुळी ।
जा घेउनिया संगती रे हें मन माझें ॥

तळमळले नयन तुझे जरि मजला कधीं पहाया ।
सुखविन तुजला । नकळत रे राया ।
येउनिया स्वप्‍नीं तुझ्या सखया ॥
झणी - अविलंब.
नवथर - नवीन.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.