येऊ कशी घन:श्याम
येऊ कशी घन:श्याम ?
काय करू मी काही सुचेना आता घरचे काम !

जादुभरी ती तुझी रे मुरली, लावी वेड जिवाला
तूच आता रे सांग श्रीधरा समाजाऊ कशी रे मनाला
आतुरले मन तुज भेटाया नाही जीवा आराम !

तुजवीण भासे सुने सुने हे गोकुळ सारे मजला
अंत नको रे पाहू आता दर्शन दे राधेला
दिनराती मी जपते आहे मुखी तुझे रे नाम !
गीत -
संगीत - विठ्ठल शिंदे
स्वर - माणिक वर्मा