A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीधर माडगूळकर
गदिमांचे सुपुत्र व लेखक, गदिमा प्रतिष्ठान, पुणे विश्वस्त. 'जिप्सी' या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन, 'धरती' व साप्‍ताहिक 'मायभूमी' चे उपसंपादक म्हणून काम. 'आठी आठी चौसष्ट' ही कादंबरी राजकीय कादंबरीत मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील 'मंतरलेल्या आठवणी' व 'अजून गदिमा' ही पुस्तके प्रसिद्ध. वृत्तपत्रांमधून लेखन. गदिमांची गाणी व आठवणी, थोरली पाती-धाकटी पाती या सारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजक. ई.टीव्ही मराठी, झी मराठी, पुणे आकाशवाणी वरील अनेक कायर्क्रमात सहभाग. राजकारण व सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभाग.