A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अहो अहो कारभारी हो

अहो अहो कारभारी हो कारभारी
मध्यान्‌ रात्री कुठं चालला गुमान या तुम्ही माघारी

अग ल.. ल.. लंका, नको श.. शं.. शंका
अडवू नको मला तू युक्तीनं
हातात टाळ, ग.. ग.. गळ्यात माळ
भ.. भ.. भजनाला जातोय भक्तीनं
इठोबा रखुमाई भजन करता, तहाभूक हरतीया भा.. भा.. भादरणी

नका काढू शक्कल, हाये मला अक्कल, तमाशाला चललाय्‌ कुठं?
घरची भाकरी सोडून भायेर उकिरडा फुकताय तिथं

तमाशाला न्हाई..

मग संगती येते, खरंखोटं पहाते, बसून तुमच्या शेजारी

आता कुठं जातो, कॅ.. कॅ.. कॅन्सल करतो
कुठल्या कुठं मी झ.. झ.. झक मारली

अहो खुशाल जावा, जीव तुमी लावा, म्हायेरची मी वाट धरली

पाया पडतो, हात जो.. जो.. जोडतो
करू नको उलटी अं.. अं.. अंबारी
अगं अगं कारभारणी ग कारभारणी
अंबारी - हत्तीच्या पाठीवरचे शोभिवंत आसन.