A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय जय हो महाराष्ट्राचा

जय जय हो महाराष्ट्राचा
मर्द वीरांचा निधड्या छातीचा
राखिली माय बहिणीची लाज
देशप्रेमाचा चढला सरताज
गाऊ या कवनं त्यांची आज

इतिहास सांगतो कथा ऐकुनी घ्यावी
ऐकुन अंगाअंगाची होऊ दे लाही
पेटून उठू दे रान देशाच्या पायी
हिंदवी स्वराज्यासाठी शिवाजीपाठी
मावळे येती, स्थापुनी राज्य मराठ्यांचे
मनाच्या मानी निष्ठेचे,
फुलांचे दगडाकाट्यांचे हो

चवताळून दुश्मन आला
केला हल्ल्यामागून हल्ला
कुणी उदार जिवावर झाला
बेजार केलं वैर्‍याला हो
नरवीर तानाजी सिंह, सिंहगडी लढला
बाजीने लढविली खिंड, जिंकुनी पडला
प्राणांचे करुनी बलिदान
राखला मान, वाढली शान
देश हा झाला बलशाली

संकटे पुन्हा परत आली
कुणा पाप्याची दृष्ट झाली
गिरा लागला स्वातंत्र्याला
शिवरायांनी देह ठेवला
फंदफितुरीला ऊतच आला
वीर संभाजी कैदी झाला
पिंजर्‍यात तळमळे वाघ, खवळला नाग
झाली अंगाअंगाची आग
शहानं केला घोर अपमान
बोलला ताठ ठेवुनी मान
गिरा - ग्रहण.
निधड - पराक्रमी.