आई म्हणोनी कोणी

आई म्हणोनी कोणी
आईस हांक मारी
ती हांक येइ कानीं
मज होय शोककारी

नोहेच हांक, माते
मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणूं मी ?
आई घरीं न दारीं

चारा मुखीं पिलांच्या
चिमणी हळूंच देई
गोठ्यांत वासरांना
ह्या चाटतात गाई
वात्सल्य हें बघुनी
व्याकूळ जीव होई

येशील तूं घराला
परतून केधवां गे ?
रुसणार मी न आतां
जरी बोलशील रागें
आई' कुणा म्हणूं मी
आई घरीं न दारीं
स्वामी तिन्ही जगांचा
आईविना भिकारी
गीत- यशवंत
संगीत - वसंत देसाई
स्वर - आशा भोसले
चित्रपट- श्यामची आई
गीत प्रकार - आई चित्रगीत
कुठार - कुर्‍हाड.
केधवा - केव्हा.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा