A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ही निकामी आढ्यता कां

ही निकामी आढ्यता कां? दाद द्या अन्‌ शुद्ध व्हा !
सूर आम्ही चोरितों कां? चोरिता कां वाहवा?

मैफिलीची साथ आम्हां दैवयोगें लाभली :
न्या तुम्ही गाणें घराला, फूल किंवा पाकळी.

दाद देणें हेंहि गाण्याहून आहे दुर्घट :
गुंफणें गजरे दंवाचे आणि वायुचे घट.

नम्र व्हा अन्‌ सूर जाणा- जीवघेणा रंग हा :
साजरा उधळून आयू हो करावा संग हा.

चांदणें पाण्यांतलें की वेचितां येईलही
आणि काळोखांत पारा ये धरूं चिमटींतही.

ना परंतू सूर कोणा लावितां ये दीपसा :
सूर नोहे- तीर कंठीं लागलेला शापसा.
गीत - आरती प्रभू
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
अल्बम - मैत्र जीवाचे
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.