A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
  कुठल्याही गाण्याचे पान उघडावे. तेथे आपणांस गाण्याचे शब्द दिसतील. त्या पानावर उजव्या बाजूस ऑडिओ प्लेअर आहे.

  नाही. 'आठवणीतली गाणी' भेटकर्त्याविषयीची कुठलीही माहिती गोळा करत नाही.
  'आठवणीतली गाणी' हे संकेतस्थळ गाणं ऐकण्याच्या अनुभवाला अधिक समृद्ध करते, नुसतं गाणं ऐकण्याच्या पलीकडे नेते. सुगम संगीत किंवा शब्दप्रधान गायकीचा हा अनुभव असल्याने गाण्याचे अचूक शब्द, त्यातील अवघड शब्दांचे अर्थ, त्या पदावरील संदर्भ लेख, त्याचे वेगवेगळ्या गायकांनी केलेले आविष्कार. अभंगांचे भावार्थ, असे बरेच आयाम इथे एका गाण्याशी जोडले गेले आहेत.
  एकापाठोपाठ गाणी ऐकण्याच्या धावपळीत हे सगळे निसटून जाऊ नये, अशी इच्छा आहे. थोडा निवांतपणे घ्यावयाचा हा अनुभव आहे. अजून तरी प्ले लिस्टचा विचार नाही.
  नाही. ही सुविधा 'आठवणीतली गाणी'वर उपलब्‍द्ध नाही.
  ◦'आठवणीतली गाणी' हा मराठी संगीत आणि मराठी भाषा यांच्यावरील प्रेमासाठी स्वखर्चाने चालवलेला उपक्रम आहे.
  ◦ 'आठवणीतली गाणी' कुठल्याही कारणाने, कुठल्याही स्वरूपात, कोणाकडूनही मानधन घेत नाही.
  ◦ 'आठवणीतली गाणी'वरील गाणी डाऊनलोडसाठी अथवा ईमेलद्वारे उपलब्‍द्ध करून दिली जात नाहीत.
  म्हणजे या गीताची ध्वनीफित उपलब्‍द्ध असून ते तुम्ही त्याच्या पानावर जाऊन ऐकू शकता.
  म्हणजे या गीताची अथवा गीताच्या संदर्भातली यू-्ट्यूबवरील चित्रफित त्याच्या पानाशी जोडली आहे.
  ∙ मराठी सुगम संगीतातील गीते बर्‍याच वेळा एका विशिष्ट रागात संपूर्णतः बांधलेली नसतात, तर ती केवळ त्या रागावर आधारलेली असू शकतात. तसेच एखाद्या गीतात आपल्याला एकापेक्षा अधिक रागांच्या छटा दिसू शकतात.
  ∙ तसेच नाट्यसंगीतात कालपरत्वे पदाच्या चालीत काही बदल घडून येऊ शकतात. नाटकाच्या संहितेत नमूद केलेले राग, बंदिश किंवा तालाचे वेगळेपण, वेगवेगळ्या स्वराविष्कारांमध्ये दिसू शकते.
  ∙ गाण्यांच्या रागांविषयीची माहिती संकलित करताना अनेक संदर्भ स्‍त्रोतांचा वापर करण्यात आला आहे. कुठे दुमत असल्यास आपण संपर्क करू शकता. ती माहिती तज्ञांकडून तपासून घेतली जाईल व जर आवश्यक असेल तर बदल केला जाईल.
  ∙ तज्ञांचे मत 'आठवणीतली गाणी'साठी अंतीम असेल.

  ∙ 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध असलेल्या कुठल्याही माहितीचे प्रताधिकार आपल्याकडे असल्यास आणि ती माहिती 'आठवणीतली गाणी'वर उपलब्ध करून देण्याची आपली इच्छा नसल्यास अवश्य संपर्क करा. ती माहिती त्वरित अनुपलब्ध केली जाईल.
निवडक अभिप्राय
While at the last point of Assam on duty, Aathavanitli Gani gives us power to stay far from home and family.
- Sanjay Shasrabuddhe