जात कोणती पुसू नका
जात कोणती पुसू नका
धर्म कोणता पुसू नका
उद्यानातिल फुलांस त्यांचा रंग कोणता पुसू नका
हिरवा चाफा, कमळ निळे
सुखद सुमांचे गंधमळे
एकच माळी या सर्वांचा, गाव तयाचे पुसू नका
रहिम दयाळू तसाच राम
मशीद मंदिर मंगलधाम
जपुनी शांतीचा मंत्र मुखाने एक दुज्याला डसू नका
जन्मा आलो मुले म्हणून
भरतभूमीच्या कुशीमधून
अभेद आम्ही अजिंक्य आम्ही, नाव आमुचे पुसू नका

गीत | - | यशवंत देव |
संगीत | - | यशवंत देव |
स्वर | - | आकाशवाणी गायकवृंद |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
सुम | - | फूल. |