लाख तारका चमचम
लाख तारका चमचम करती
आभाळाच्या निळ्या अंगणी
चिमण्या बाळा मिट पापणी
झोपी गेली घरट्यांमधुनी
चिवचिवणारी रानपाखरं
शांत चराचर जग पेंगुळले
जो जो बाळा गाते रजनी
गाल गोबरे वदन हासरे
ओठ गुलाबी इवलेइवले
कुरळे कुरळे केस कपाळी
काजळ काळे भरले नयनी
आभाळाच्या निळ्या अंगणी
चिमण्या बाळा मिट पापणी
झोपी गेली घरट्यांमधुनी
चिवचिवणारी रानपाखरं
शांत चराचर जग पेंगुळले
जो जो बाळा गाते रजनी
गाल गोबरे वदन हासरे
ओठ गुलाबी इवलेइवले
कुरळे कुरळे केस कपाळी
काजळ काळे भरले नयनी
| गीत | - | मा. दा. देवकाते |
| संगीत | - | बाळ पळसुले |
| स्वर | - | सुमन कल्याणपूर |
| चित्रपट | - | तेवढं सोडून बोला |
| गीत प्रकार | - | चित्रगीत |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












सुमन कल्याणपूर