तज्ञ समिती | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online
A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तज्ञ समिती
खालील मान्यवर, त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्रात 'आठवणीतली गाणी'स दिशादर्शन करतात. मराठी गाणी आणि मराठी भाषा यांच्यावरील प्रेमासाठी, अत्यंत नि:स्वार्थ हेतूने ते ही मदत करतात. कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द अपुरे !
श्री. विकास कात्रे (हिंदुस्तानी शास्‍त्रीय राग)

श्री. विकास कात्रे हे सोलो संवादिनीवादक आणि शास्‍त्रीय गायक असून ठाणे येथे स्थायिक आहेत. त्यांनी ग्वाल्हेर घराण्याचे कै. विनायकबुवा काळे यांजकडे पेटीवादन आणि ख्याल गायन याची २० वर्षे रीतसर तालीम घेतली आहे. तसेच सोलोवादनाची त्यांची तालीम प्रख्यात संवादिनीवादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांच्याकडे अनेक वर्षे झाली आहे. अनेक प्रतिष्ठित ठिकाणी आणि संगीताच्या उत्सवांत त्यांचे सोलोवादनाचे कार्यक्रम झाले आहेत. सध्या ते ग्वाल्हेर-आग्रा घराण्याचे बुजुर्ग पं. अरुण कशाळकर यांच्याकडे गाण्याची तालीम घेत आहेत. यांचे वास्तव्य ठाणे, महाराष्ट्र येथे आहे.

Aashay Vibhas (Technology)

Aashay is a Solution Architect and IT Consultant in the AI, IP and ERP domains and has extensive knowledge and implementation experience in these areas.
Aashay does volunteer work for under privileged children in several countries. In his spare time Aashay is an avid cyclist and trekker having scaled the Kilimanjaro summit in 2018.
He lives in Dubai.

निवडक अभिप्राय
आताशा कृतघ्‍न व्हायचं ठरविलं होतं. तरी या अधांतरी प्रवासात ऋण मानण्यासाठी / वसुलीसाठी तुम्ही भेटलाच की…!! तुमच्या योगे बर्‍याच दिवसांनी सी. रामचंद्रंचा 'जोगिया' ऐकण्याचा आनंद लाभला. ॠणानुबंधात सुख आहे.
- मनोज रावराणे