A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
युवतिमना दारुण रण

युवतिमना दारुण रण रूचिर प्रेमसे झाले ।
रणभजना संसारी असे अमर मी केले ॥

रमणिमनहंसा नर साहस सरसी रमवी
शूर तोचि, विजय तोचि, हे शुभ यश मज आले ॥
गीत - कृ. प्र. खाडिलकर
संगीत - गोविंदराव टेंबे
स्वराविष्कार- रामदास कामत
आशा भोसले
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
नाटक - संगीत मानापमान
राग - हंसध्वनी
ताल-दादरा
चाल-मनसुकरक
गीत प्रकार - नाट्यसंगीत, मना तुझे मनोगत