काही विशेष अभिप्राय
धुक्यात हरवले होते काही शब्द, सुमधुर वाणी
प्रकाशात आणली तुम्ही परत आठवणीतली गाणी ........
- संजय गावडे
आपली ’आठवणीतली गाणी’ ही साठवण मनाला खूप भावली. साठीच्या उंबरठ्यावर नातवंडांसमवेत गाणी म्हणताना बऱ्याच वेळा गाण्याची सुरूवात होई, परंतु पुढील ओळ न आठवल्याने हिरमोड होई. ती चिंता आता उरली नाही. कोणतेही गाणे शब्द पहात ऐकता येते. आनंद द्विगुणीत होतो. साठीच्या विस्मृतीवर रामबाण उपाय मिळाला आहे. धन्यवाद......!!!!!
- डॉ. अरविंद भा. वैद्य
संगीतातली चळवळ आहे ही. आम्ही सोबतीला आहोत...
- अशोक भालेराव
जवळजवळ दोन-तीन महिन्यांपूर्वी मी कामानिमित्त सैबेरीयाच्या दक्षिण वाळवंटामध्ये होतो. सध्या हा भाग कझाकीस्तानात येतो. -२२ अंश तापमानात काम करुन अंथरुणात जिवंत मढ्यासारखे शिरण्याखेरीज दुसरा पर्याय नसायचा. ..आणि का कुणास ठाऊक? अशाच विमनस्क अवस्थेमध्ये अचानक मी एक ओळ गुणगुणलो.... त्या सावळ्या तनूचे, मज लागले पिसे ग, न कळे मनास आता त्या आवरु कसे ग. आईची खूप आठवण आली..... मी हे गाणं माझ्या आईकडून सगळ्यात पहिल्यांदा ऐकले होते, पुढच्या ओळी आठवेनात. अधाशासारखा ’आठवणीतली गाणी’ वर गेलो... त्यानंतर जवळजवळ तासभर ते गाणं मी ऐकले...पुन्हापुन्हा ऐकले...कोपरान कोपरा, स्वरन स्वर ऐकला.
- मधुसूदन आजगांवकर
मराठी मधला पहिला गीत संच उपलब्ध करून दिल्या बद्दल आपण तमाम मराठी रयाते कडून धन्यवादास पात्र झाला आहात. अत्यंत सूचीबद्ध आणि निर्दोष मांडणी व तसेच सहज वावर यांमुळे ज्येष्ठ व्यक्तींसाठीही महत्वपूर्ण अशी संगीत मेजवानी दिल्याबद्दल आपण साधूवादास पात्र आहात.
- प्रणव जोशी
इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे.
- सुनील जोगळेकर
आताशा कृतघ्न व्हायचं ठरविलं होतं. तरी या अधांतरी प्रवासात ऋण मानण्यासाठी / वसुलीसाठी तुम्ही भेटलाच की...!! तुमच्या योगे बर्‍याच दिवसांनी सी. रामचंद्रंचा "जोगिया" ऐकण्याचा आनंद लाभला. ॠणानुबंधात सुख आहे.
- मनोज
We came to know about your site today through local daily Sakal Newspaper. It is as good as a new family member introduced /entered in our family.
- C. R. Mulay & family
'लाल बत्ती हिरवी झाली' या कवितेबाबत मला माझा अभिप्राय मांडावयाचा आहे. मी हे गाणे आकाशवाणीवर अनेकदा ऐकले होते. पण मला ते वाचायचे होते व माझ्या संग्रही ठेवायचे होते. तो योग आपल्यामुळे आला त्याबद्दल धन्यवाद !!!!
- सौरभ सुरेश शेट्ये
I am travelling all over the world and living out of hotel rooms and airport lounges (when flights are delayed) since the past few years (for work reasons), cut off from my family and all Marathi world.
While searching on the web, I came across Aathavanitli Gani. I came across hundreds of Marathi songs which I knew letter-by-letter from my childhood, but have not been able to listen to, for quite some time for various reasons. Mantra Mugdh!
- Atul Kherde
मी एका वृद्धाश्रमाची संचालिका आहे. मला इथे आवर्जून उल्लेख करावयाचा आहे की आमच्या आश्रमात आपल्या संकेतस्थळाचा फार उपयोग होतो. या निमित्ताने अनेक आजी आणि अजोबा संगणकाच्या वापराचा प्रयत्न करीत आहेत. धन्यवाद !!
- निर्मला शेवडे
It is a remarkable collection of the lyrics that allows multiple searching options and demonstrates the direct touch with our beloved language. In the pure Maharashtrian households where children learn in the convent schools and learn "Baba Black ships" faster than "Chiutai..", at least "Aathvanitali Gani" doesn't provide any excuse to the people who crib about the availability of the lyrics and basic information!
- Parimala Bhole
वर्तमान आणि भविष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून तर बघा !
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले ?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा !
दोन क्षणांची ओळख दोन क्षणांची मैत्री
मला का वाटली कोणीतरी सोबत असल्याची खात्री
- सचिन मोरे
I am very much grateful for creating such a wonderful resource for Marathi songs. It is not just the encyclopedia for lyrics but the amount of effort you have put in organizing the songs wrt various dimensions like music, film, raag etc. is quite astonishing. Interface is also gratifying. No advertisement is beyond my comprehension. In short it is an awesome effort.
I am poor at grasping the words of song while listening to it. I would like to assure you that the motive of the site is very much getting served as I am multiplying the joy of listening to song as I am understanding the words of composition through this site.
- Pavan Jalwadi
I was nostalgic to see those songs hummed & loved by my dear MOM DAD. May God give you lot of blessings, duwa & aashirwad.
- Suhas Choudhari
(काही मिनिटांसाठी तांत्रीक कारणाने website उपलब्ध नसतानाच्या काळात)
अस्वस्थ झालोय. आज आमच्या आठवणींचे काय करायचे? गाण्यांना उजाळा देणे शक्य होत नाही आहे.
- र. न. उपाध्ये
 
Join to blog, comment, etc.
Follow Aathavanitli Gani on twitter.