अशोक चक्रांकिता ध्वजा ही
अशोक चक्रांकिता ध्वजा ही राष्ट्राची देवता
वंदनिया ही स्फूर्तिदायिनी सार्वभौम भारता
रंगत्रय-भूषिता भगवति घोषितसे एकता
मानव विश्वालागी अवघ्या आश्वासी शांतता
पुण्यदर्शने हिच्या स्फुरावी दास्याते मुक्तता
छायेखाली हिच्या नांदते समानता, अस्मिता
शतकोटी कर हिची रक्षिती प्राणपणे योग्यता
भव्य भविष्या हिची उजळिते तेजस्विनी दिव्यता
अखंड फडकत राहिल ही या भारतीय व्योमी
हिच्या पदतळी सुवर्ण उगविल भारतीय भूमी
सदा विजयिनी, भाग्यशालिनी, पंचशील पूजिता
शस्त्रे, शास्त्रे सर्व वाहिली हिच्या प्रतिष्ठेप्रती
हिच्या प्रतिष्ठेसाठी सारी धृति-कृति-जागृति
धर्मध्वजही हिची मानिती सर्वंकष श्रेष्ठता

गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | |
स्वर | - | |
गीत प्रकार | - | स्फूर्ती गीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया alka@aathavanitli-gani.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
अस्मिता | - | स्वत्व, स्वाभिमान. |
धृति | - | धैर्य / दृढता. |
व्योम | - | आकाश. |