कशी मी सांगू वडिलांपुढे
कशी मी सांगू वडिलांपुढे
श्रावणातल्या घन मेघांचा रंग मला आवडे
मला आवडे मुरलीवादन
चक्र सुदर्शन कमळे गोधन
राजकन्यका असून वनांचा छंद मनाला जडे
स्वप्नी माझ्या यमुना येते
गोपालांचा खेळ सांगते
त्या खेळातच फुटती, माझ्या माथ्यावरचे घडे
काय बोलू मी, सुता कुलवती
नाव ऐकता नयने लवती
एक सांगते उडूनिया मन गेले मथुरेकडे
श्रावणातल्या घन मेघांचा रंग मला आवडे
मला आवडे मुरलीवादन
चक्र सुदर्शन कमळे गोधन
राजकन्यका असून वनांचा छंद मनाला जडे
स्वप्नी माझ्या यमुना येते
गोपालांचा खेळ सांगते
त्या खेळातच फुटती, माझ्या माथ्यावरचे घडे
काय बोलू मी, सुता कुलवती
नाव ऐकता नयने लवती
एक सांगते उडूनिया मन गेले मथुरेकडे
गीत | - | ग. दि. माडगूळकर |
संगीत | - | प्रभाकर जोग |
स्वर | - | मालती पांडे |
गीत प्रकार | - | भावगीत, हे श्यामसुंदर |
सुता | - | कन्या. |