सख्या चला बागामधी
सख्या चला बागामधी रंग खेळू चला !
गुलालगोटा घ्यावा लाल हाती
तो फेकुन मारा छाती
रंगभरी पिचकारी तुमच्या हाती
तरी करीन मी ती रिती
जसा वृंदावनी खेळे श्रीपती
(गोपी घेउनी सांगाती)
मोद होईल मज हळूच जवळी धरा
अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला !
लालीलाल करावा पोशाख तुम्ही
रथ सजवुनी बहुगुणी
आज्ञा करा हो माझे लाल धनी
लाल नेसेन मी पैठणी
लाल कंचुकी आवडते मज मनी
(हिला शोभतो तन्मणी)
आत्ता राया चला सण शिणगाराचा करा
अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला !
गुलालगोटा घ्यावा लाल हाती
तो फेकुन मारा छाती
रंगभरी पिचकारी तुमच्या हाती
तरी करीन मी ती रिती
जसा वृंदावनी खेळे श्रीपती
(गोपी घेउनी सांगाती)
मोद होईल मज हळूच जवळी धरा
अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला !
लालीलाल करावा पोशाख तुम्ही
रथ सजवुनी बहुगुणी
आज्ञा करा हो माझे लाल धनी
लाल नेसेन मी पैठणी
लाल कंचुकी आवडते मज मनी
(हिला शोभतो तन्मणी)
आत्ता राया चला सण शिणगाराचा करा
अन् सख्या चला बागामधी रंग खेळू चला !
| गीत | - | रामजी |
| संगीत | - | भास्कर चंदावरकर |
| स्वर | - | उषा मंगेशकर |
| चित्रपट | - | सामना |
| गीत प्रकार | - | चित्रगीत, लावणी |
| कंचुकी | - | चोळी. |
| गुलालगोटा | - | लाखेचा अतिशय पातळ पापुद्र्याचा पोकळ चेंडू करून आत गुलाल भरतात तो. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












उषा मंगेशकर