परम गहन ईशकाम
परम गहन ईशकाम । विश्वा जरि पुण्यधाम ।
मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे ।
क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यात ।
मानुषी मनीषा । गणन काय त्यांचे? ॥
मनुजा तरी गूढ चरम । चिर अभेद्य साचे ।
क्रीडा दैवी विराट । मनुजसृजन क्षुद्र त्यात ।
मानुषी मनीषा । गणन काय त्यांचे? ॥
गीत | - | वि. सी. गुर्जर |
संगीत | - | गंधर्व नाटक मंडळी, बाई सुंदराबाई |
स्वर | - | |
नाटक | - | संगीत एकच प्याला |
राग | - | भूप |
ताल | - | एकताल |
चाल | - | रतन रजक कनक |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
टीप - • या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल. |
सृजन | - | निर्मिती. |