A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अग्गोबाई ढग्गोबाई

अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ‌ऽऽ लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ !
थोडी न्‌ थोडकी, लागली फार !
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार !!

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌..
ढोल्या ढोल्या ढगात ढुम्‌ ढुम्‌ ढुम्‌..
वीजबाई अशी काही तोर्‍यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !!

खोल खोल जमिनीचे उघडून दार
बुड बुड बेडकाची बडबड फार !
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको.. थोडा चिखल लगाव !!
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - अग्गोबाई ढग्गोबाई
गीत प्रकार - बालगीत, ऋतू बरवा, नयनांच्या कोंदणी

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.