चल नाच नाच रे नंदकिशोरा

चल नाच नाच रे नंदकिशोरा
सूर मुरलिचा घुमव जरा

रुमझुम रुमझुम पैंजण वाजति
तालावरती गोपी नाचती
सुर स्वर्गातुनी कौतुक पाहति
आनंदाचा दिवस खरा

जललहरींचा नाच थांबला
अवखळ वायू मध्ये थबकला
कोकीळ गाई न गायनाला
काय जादू ही मुरलीधरा

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा