दिन तैसी रजनी झाली गे
दिन तैसी रजनी झाली गे माये ॥१॥
पडिलें दूरदेसी, मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥
अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥
गरूडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।
बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥४॥
पडिलें दूरदेसी, मज आठवे मानसी ।
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ॥२॥
अवस्था लावोनी गेला अजून का न ये ॥३॥
गरूडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा ।
बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठला ॥४॥
| रचना | - | संत ज्ञानेश्वर |
| संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
| स्वर | - | आशा भोसले |


















