A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जा उडुनी जा पाखरा

जा उडुनी जा पाखरा
नयनमनोहर पाहुनि परिसर भुलू नको रे जरा

चंचल खग हे पंख पसरुनी आक्रमिती अंबरा
स्वातंत्र्याची मंगल गीते गात चालले घरा
तूही उडूनी जा पाखरा

दिशा दिशा या गुलाल उधळित करिती सण साजरा
रविकिरणांनी आज उजळला गगनाचा उंबरा
जा जा सोडुनी ह्या तरुवरा
खग - पक्षी.
तरुवर - तरू / झाड.
'जादूनगरी'त शिरण्यापूर्वी

ही एक सुंदर, सुशिक्षित चेटकिणीची प्रेमकथा !
मराठी रंगभूमीवर अद्यापी न रुजलेल्या विषयांपैकी हा एक.
त्या दृष्टीने हे एक धाडसच !

एका पाश्चात्य नाट्यकृतीचा या मराठी कृतीला काही प्रमाणात आधार लाभला आहे.

रंजन कलामंदिर, नागपूर या हौशी नाट्यसंस्थेने अभिनेत्यांच्या 'थोरल्या पाती' द्वारे महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत चार वेळा नाट्यप्रयोग-पारितोषिके मिळवल्यानंतर 'धाकटी पाती' रिंगणात उतरली. त्यांना नवीन, प्रयोगक्षम, वैचित्र्यपूर्ण, मनोरंजनप्रधान नाटक हवे होते.
यांच्यासाठी लिहिलेले हे नाटक त्यांनाच सप्रेम समर्पण.
(संपादित)

पुरुषोत्तम दारव्हेकर
'नयन तुझे जादुगार' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.