जगी हा खास वेड्यांचा

जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा
गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा 'वेड' हा तारा

कुणाला वेड कनकाचे, कुणाला कामिनी जाचे
भ्रमाने राजसत्तेच्या कुणाचे चित्त ते नाचे

कुणाला देव बहकवी, कुणाला देश चळ लावी
कुणाची नजर धर्माच्या निशेने धुंदली भारी

अशा या विविध रंगाच्या पिशांच्या लहरबहरींनी
दुरंगी दीन दुनियेची जवानी रंगली सारी
गीत- वीर वामनराव जोशी
संगीत - वझेबुवा
स्वर - मा. दीनानाथ
नाटक- रणदुंदुभि
चाल-नियामत सखे आई है
  गजल
गीत प्रकार - नाट्यगीत

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा