A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जय जय हे भगवति सुरभारति

या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

जय जय हे भगवति सुरभारति
तव चरणौ प्रणमामः
नादब्रह्ममयि जय वागीश्वरि
शरणं ते गच्छामः ॥

त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या
सुर-मुनि-वन्‍दित-चरणा
नवरसमधुरा कवितामुखरा
स्मित-रुचि-रुचिराभरणा ॥

आसीना भव मानसहंसे
कुन्‍द-तुहिन-शशि-धवले
हर जडतां कुरु बोधिविकासं
सित-पङ्कज-तनु-विमले ॥

ललितकलामयि ज्ञानविभामयि
वीणा-पुस्तक-धारिणी
मतिरास्तां नो तव पदकमले
अयि कुण्ठाविषहारिणि
गीत - हरीराम आचार्य
संगीत - कनू घोष
स्वर- आकाशवाणी गायकवृंद
गीत प्रकार - प्रार्थना, या देवी सर्वभूतेषु
जड - अचेतन.
तुहिन - शीतल.
भगवती सुरभारती - देवी सरस्वती
मुखर - बडबड.
वागीश्वरी (वाग्देवी) - सरस्वती.
विमल - स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर.
सुर - देव.
संस्थिती - कायम स्थान.
या देवी सर्वभूतेषु कलारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

जी देवी सर्व प्राणीमात्रांमध्ये सकल कलांच्या रूपाने वास करते, त्या देवीस माझा त्रिवार नमस्कार असो. वारंवार नमस्कार असो.

जय जय हे भगवति सुरभारति
तव चरणौ प्रणमामः
नादब्रह्ममयि जय वागीश्वरि
शरणं ते गच्छामः ॥

हे देवी सरस्वती, तुझ्या पदचरणांशी माझा प्रणिपात. नादब्रह्म स्वरूपिणी वाग्‍देवते, तुला मी शरण येत आहे.

त्वमसि शरण्या त्रिभुवनधन्या
सुर-मुनि-वन्‍दित-चरणा
नवरसमधुरा कवितामुखरा
स्मित-रुचि-रुचिराभरणा ॥

हे देवी, तुझ्यामुळे तिन्ही लोक धन्य आहेत. ते तुला शरण आहेत. देवता व मुनिजन तुज पदवंदन करतात. नऊ रसांनी युक्त, मधुर असे काव्यगायन करणार्‍या देवते, स्मितवदन-मोहक-दिव्य देवते, तुझा जयजयकार असो !

आसीना भव मानसहंसे
कुन्‍द-तुहिन-शशि-धवले
हर जडतां कुरु बोधिविकासं
सित-पङ्कज-तनु-विमले ॥

चंद्रासारख्या शीतल, कोमल आणि शुभ्र किरणांप्रमाणे श्वेत राजहंसावर विराजमान असलेल्या हे सरस्वती देवी ! माझी मंद बुद्धी दूर करून मला प्रगतीपथाचा मार्ग दाखव. श्वेतकमलावर वास करणार्‍या हे पवित्र देवते, तुझा सदैव विजय असो !

ललितकलामयि ज्ञानविभामयि
वीणा-पुस्तक-धारिणी
मतिरास्तां नो तव पदकमले
अयि कुण्ठाविषहारिणि

ललितकला (गायन, वादन, नर्तन आदि) अवगत असलेल्या देवते, ज्ञानाची आभा (चमक) तसेच वीणा आणि पुस्तक धारण क्ररणार्‍या देवते, माझी मूर्खता (बुद्धीचे जडत्व) तसेच माझ्या सर्व दोषांचे निवारण करणार्‍या हे सरस्वती देवी, माझी बुद्धी सदैव तुझ्या चरणांवर लीन असू दे.
(संपादित)

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.