A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झन झननन छेडिल्या तारा

झन झननन छेडिल्या तारा
पदी नूपुर बोलती तत्कारा

मदन मेनका मस्त मयूरी
आरसपानी रूप बिलोरी
नर्तनातुनी आवर्तन हे उधळी रंग पिसारा

यौवनातल्या वनी उर्वशी
प्रणय खेळते रेशीम स्पर्शी
लहरीमधुनी बहर येऊ दे आतुरल्या शृंगारा

सूर-ताल जणू संगम झाला
शब्द सुगंधी मधात न्हाला
मुके होउनी धुके मुलायम बरसत अमृतधारा
आरसपान - संगमरवरी दगड.
बिलोरी - काचेचे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.