खेळेल का देव माझिया
खेळेल का देव माझिया अंगणी ?
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी ?

गोजिरा श्रीहरी साजिर्‍या पाऊली
येईल हासत माझिया जीवनी

सानुलेसे रूप उभे माझ्या दारी
मज मागेल का दही-दूध-लोणी ?

साठवीन ज्यासी माझिया अंतरी
पुरेल जिवींच्या आवडीची धनी