A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लई बाई लबाड दिसतोय ग

माझ्याकडं बघून, डोळा बारीक करून
पाहुणा गालात हसतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

उगाच मिशिला देतुया पीळ,
तोंडानं हलकेच घालतुया शीळ
पुन्हापुन्हा बघुन, छाती पुढे काढून,
उगाच ऐटीत चालतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

सकाळच्या पारी पाण्याला जाता
उभा राहून ग रोखतुया वाटा
जरतारी फेटा बांधुन मोठा
रुबाब अपुला दावतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !

पाण्यानं भरुन घेता ग घागर
हिसळून पाणी भिजतुया पदर
मदनाचा बोका घेतुया झोका
मलाच कोड्यात घालतोय ग,
लई बाई लबाड दिसतोय ग !
गीत - म. पां. भावे
संगीत - विश्वनाथ मोरे
स्वर-
गीत प्रकार - लावणी, नयनांच्या कोंदणी
  
टीप -
• या गीताचे मूळ ध्वनीमूद्रण आमच्याकडे नाही. आपल्याकडे असल्यास, कृपया aathavanitli.gani@gmail.com या इ-पत्त्यावर पाठवा. ते रसिकांना ऐकण्यासाठी इथे उपलब्ध करून दिले जाईल.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.