पडिलें दूरदेशीं

पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं ।
नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥

दिनु तैसी रजनी मज जाली गे माये ।
अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये ॥२॥

गरुडवाहना, गंभीरा येईं गा दातारा ।
बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥
अवस्था - उत्कंठा.
भावार्थ :
परमेश्वर दर्शन देत नाही आणि त्याच्या भेटीची तर तळमळ लागून राहिली आहे अशी भावस्थिती ज्ञानेश्वरांच्या या अभंगांमधून प्रकट होते.

परमेश्वरापासून आपण दूर पडलो आहोत आणि वियोगामुळे सारा जीव पोखरून निघत आहे. परमेश्वरानेच आपाल्याला असे वेडे केले आणि अजून येत नाही. त्यामुळे दिवसही काळोख होऊन गेला. तेव्हा परमेश्वरा, लवकर दर्शन दे.

ज्ञानेश्वरांचे निवडक शंभर अभंग
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. द. ता. भोसले

सौजन्य : प्रतिमा प्रकाशन, पुणे ३०

  इतर भावार्थ

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा