पुनवेचा चंद्रम आला घरी
पुनवेचा चंद्रम आला घरी
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुर्यात
खार्याखार्या वार्यात
तुझामाझा एकान्त रे, साजणा !
लाटांचे गीत निळे
काठाला ते गूज कळे
सागरकाठा भिडती लाटा
श्वासाला त्या श्वास जुळे
निळ्यानिळ्या पाण्यात
एका खुळ्या गाण्यात
तुझामाझा एकान्त रे, साजणा !
चंदेरी धुंद हवा
साथीला तूच हवा
थरथरणारा एक शहारा
या रात्रीचा रंग नवा
लाजर्या या गालांत
हृदयाच्या तालात
तुझामाझा एकान्त रे, साजणा !
चांदाची किरणं दर्यावरी
चांदण्याच्या चुर्यात
खार्याखार्या वार्यात
तुझामाझा एकान्त रे, साजणा !
लाटांचे गीत निळे
काठाला ते गूज कळे
सागरकाठा भिडती लाटा
श्वासाला त्या श्वास जुळे
निळ्यानिळ्या पाण्यात
एका खुळ्या गाण्यात
तुझामाझा एकान्त रे, साजणा !
चंदेरी धुंद हवा
साथीला तूच हवा
थरथरणारा एक शहारा
या रात्रीचा रंग नवा
लाजर्या या गालांत
हृदयाच्या तालात
तुझामाझा एकान्त रे, साजणा !
गीत | - | शान्ता शेळके |
संगीत | - | बाळ पार्टे |
स्वर | - | कृष्णा कल्ले |
चित्रपट | - | मंगळसूत्र |
गीत प्रकार | - | शब्दशारदेचे चांदणे, चित्रगीत |
गुज | - | गुप्त गोष्ट, कानगोष्ट. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.