A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
रात्र काळी घागर काळी

रात्र काळी घागर काळी ।
यमुनाजळें ही काळी वो माय ॥१॥

बुंथ काळी बिलवर काळी ।
गळां मोतीं एकावळी काळीं वो माय ॥२॥

मी काळी कांचोळी काळी ।
कांस कांसिली ते काळी वो माय ॥३॥

एकली पाण्याला नवजाय साजणी ।
सवें पाठवा मूर्ति सांवळी वो माय ॥४॥

विष्णुदास नाम्याची स्वामिणी काळी ।
कृष्णमूर्ति बहु काळी वो माय ॥५॥
एकावळी - एकपदरी हार.
काचोळी - मागे बंद असलेली चोळी.
कांस कांसिली - नेसलेले लुगडे / पातळ.
बुंथी - आवरण / पडदा / आच्छादन.
बिलवर - उच्‍च प्रतीची काचेची बांगडी.
पृथक्‌
• श्री नामदेव गाथा (संग्राहक श्री. नानामहाराज साखरे) या ग्रंथात ही २२८२ क्रमांकाची रचना आहे.
• या गाथेतील
२२८९ क्रमांकाची 'हातीं घेवूनियां काठी',
२३०२ 'क्रमांकाची प्रात:काळी प्रहरा रात्रीं',
२३१२ 'क्रमांकाची उठा पांडुरंगा आतां दर्शन'
या आणि अशा काही रचनांच्या शेवटी 'विष्णूदास नामा' अशी नाममुद्रा आढळते.

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर